प्रकल्प

a1
रुग्णवाहिका

संस्थेने समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी अगदी स्वस्त दरात रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. २००४ ते आतापर्यंत हि सेवा लोकार्पण असून यशस्वीपणे सुरु आहे. तसेच वसई प्राथमिक आरोग्य केंद्रात नाममात्र दरात शव-वाहीनीच्या स्वरुपात देखील सुरु आहे.

a2

सदिच्छा हेल्थ क्लब

स्थानिक नागरीक आणि औद्योगिक वसाहतीतील तरुण पिढीला शरीर सौष्ठव आणि उत्तम आरोग्य रक्षण्याकरिता कमी दारात उपयुक्त अशी अद्ययावत व्यायामशाळा संस्थेने चालू केली आहे.

a3

कै. मीनाताई ठाकरे पाणीपोई

नवघर पुर्वेमधील जनतेसाठी आणि कारखान्यातील कामगारांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय पाणीपोई च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. २००७ साली शिवसेनेच्या आमदार सौ. मनीषाताई निमकर यांच्या हस्ते लोकार्पण असून कार्यरत आहे.

a4

सुलभ शौचालय

नवघर पूर्व भागात वीर संभाजी नगर मध्ये निर्मल फाउंडेशन आणि MMRDA यांच्या संयुक्त विद्यमाने १६ सीटर ग्राउंड + १ अशी दोन सुलभ शौचालये संस्थेला हस्तांतरित झाली आहेत व त्यांची देखभाल आजपर्यत संस्थेकडून केली जात आहे.

a5

पोलीस चौकी

आमदार श्री. विवेक भाऊ पंडित यांच्या आमदारनिधीतून आणि संस्थेच्या आर्थिक सहयोगाने नवघर वसई पूर्वेला पोलीस चौकी बांधून देण्यात आली आहे

a6

सदिच्छा सभागृह

आमदार श्री. विवेक भाऊ पंडित यांच्या आमदारनिधीतून आणि संस्थेच्या आर्थिक सहयोगाने सदिच्छा सभागृहाचा पहिला मजला बांधण्यात आला. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री राजाराम बाबर यांचे वडील कै. माणिकराव रामकृष्ण बाबर यांच्या स्मरणार्थ, संस्थेचे खजिनदार श्री शाशिभूषण शर्मा यांच्या आई कै. सौ. लालमणी गुल्लुप्रसाद शर्मा यांच्या स्मरणार्थ व कै. सौ. वंदना विनायक निकम (आमच्या लाडक्या वाहिनी) यांच्या स्मरणार्थ दुसरा मजला सभागृह म्हणून बांधून देण्यात आला.