सदिच्छा सेवा मंडळ परिचय 

सन १९८३ साली स्थापनेपासून म्हणजे गेल्या तीन दशकापेक्षा जास्त काळ सदिच्छा सेवा मंडळ सेवाकार्यरत आहे. नवरात्रोत्सव आयोजनाच्या माध्यमातून संस्थेने समाज उत्थान आणि लोक कल्याणाच्या भावनेने विविध कार्यक्रम राबविले आहेत. वसई च्या स्थानिक जनतेने त्यात नेहमीच भरघोस सहकार्य करून उत्तम प्रतिसाद दिला आहे.

केवळ धार्मिक सण साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता संस्थेने आजतागायत समाज कल्याणाच्या विविध कार्यात भरीव योगदान दिले आहे. त्यात रुग्णवाहिका, स्थानिक तरुणांसाठी व कामगारांसाठी अद्ययावत व्यायामशाळा, पाणीपोई, पोलीस चौकी, सदिच्छा सभागृह, त्याबरोबरच ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थांना शाळोपयोगी साहित्य वाटप करणे, वरिष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, आरोग्य चिकित्सा शिबीर भरवणे असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत.

सदिच्छा सेवा संस्थेने विविध स्तरावर वेगवेगळे सामाज उपयोगी उपक्रम पार पाडण्यास हाती घेतले आहेत त्यात वृद्धाश्रम, शाळा आणि ग्रामीण भागातील सेवा-निर्माणकार्ये आहेत. जनतेला हृदयपुर्वक आवाहन आहे कि आपले आशीर्वाद आणि मोलाचे सहकार्य जरूर द्यावे. संस्थेच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्यात सहभागी व्हावे.

आगामी कार्यक्रम
झालेले कार्यक्रम
संपर्क साधा
अपडेट्स